गोव्याला तिसऱ्यांदा ‘अन्न सुरक्षा’ पुरस्कार

‘एफडीए’च्या संचालक ज्योती सरदेसाई यांना प्रदान


22nd September 2021, 12:28 am
गोव्याला तिसऱ्यांदा ‘अन्न सुरक्षा’ पुरस्कार

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते ‘अन्न सुरक्षा’ पुरस्कार स्वीकारताना ज्योती सरदेसाई.


प्रतिनिधी। गोवत वार्ता
पणजी : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे देण्यात येणारा अन्न सुरक्षा पुरस्कार यंदा गोवा अन्न व औषधी प्रशासनाला मिळाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते नुकताच खात्याचा संचालक ज्योती सरदेसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा पुरस्कार हा गोवा अन्न व औषधी प्रशासन खात्याला मिळाला आहे.
हा पुरस्कार पाच मापदंडाच्या आधारावर दिला जातो. यात मानव संसाधन आणि संस्थात्मक टेडा, अंमलबजावणी आणि अनुपालन, पायाभूत सुविधा चाचणी, ग्राहक सक्षमीकरण, प्रशिक्षण आणि जागरूकता अशा पाच स्थरांवर हा पुरस्कार दिला जातो. या पाचही स्थरावर गोवा अन्न व औषध प्रशासनाने चांगली कामगिरी केली असल्याने हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जाते. खात्याचे अधिकारी प्रत्येक दुकानांची तपासणी करत असतात. सण उत्सवाच्यावेळी मोठ्या प्रमाणात तपासणी केली जाते. लोकांना चांगल्या दर्जाचे पदार्थ मिळावे हा आमचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे भेसळ आणि इतर बनावटीवर प्रशासनाची नजर आहे, असे संचालिका ज्योती सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.