चेन्नईच्या विजयात ऋतु‘राज’


19th September 2021, 11:57 pm
चेन्नईच्या विजयात ऋतु‘राज’

ऋतुराज गायकवाड

दुबई : आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव केला. चेन्नईने प्रथम खेळल्यानंतर २० षटकांत सहा गडी बाद १५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ निर्धारित षटकांत केवळ १३६ धावा करू शकला. आयपीएल २०२१ मध्ये चेन्नईचा हा सहावा विजय आहे. आता त्यांचे आठ सामन्यात १२ गुण आहेत.

या विजयासह चेन्नईने आयपीएल २०२१ च्या पूर्वार्धातील पराभवाचा बदलाही घेतला. खरे तर भारतात खेळल्या गेलेल्या पूर्वार्धात चेन्नईला मुंबईविरुद्ध २१८ धावा करूनही सामना जिंकता आला नाही. त्या सामन्यात मुंबईने गमावलेला सामना जिंकला होता. मात्र, आज चेन्नईने त्या पराभवाचा बदला घेतला.

आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम खेळल्यानंतर २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या. पहिल्या १० षटकांत चेन्नईने चार गडी गमावून केवळ ४३ धावा केल्या होत्या, पण पुढच्या १० षटकांत ऋतुराज गायकवाडच्या शानदार खेळीमुळे त्यांनी ११३ धावा केल्या आणि मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे लक्ष्य ठेवले.

ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जसाठी शानदार खेळी खेळली. त्याने ५८ चेंडूत नाबाद ८८ धावांची अप्रतिम खेळी खेळली. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि चार षटकार ठोकले. त्याचवेळी ड्वेन ब्राव्होनेही तीन षटकारांच्या मदतीने अवघ्या आठ चेंडूत २३ धावा केल्या.

चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब

नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिस ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर खाते उघडल्याशिवाय पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मोईन अलीही दुसऱ्या षटकात अॅडम मिल्नेच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला.

यानंतर अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. रायुडूचे मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रदर्शन चांगले आहे. हे पाहता कर्णधार एमएस धोनीने त्याला बढती दिली. पण अॅडम मिल्नेच्या गोलंदाजीत तो दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला. नंतर सुरेश रैना क्रीजवर फार काळ टिकू शकला नाही. तो सहा चेंडूत फक्त चार धावा करून बाद झाला.

तीन षटकांत फक्त सात धावांत तीन गडी बाद झाल्यानंतर धोनी क्रीजवर आला. पण त्यानेही निराशा केली आणि पाच चेंडूत तीन धावा केल्यावर तो बाद झाला. धोनीला अॅडम मिल्नेने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पॉवर प्लेमध्ये चेन्नईची धावसंख्या चार गडी बाद २४ धावा होती.

जडेजा, गायकवाडमध्ये महत्त्वपूर्ण भागिदारी

२४ धावांत केवळ चार गडी गमावल्यानंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी ८१ धावांची भागिदारी केली. जडेजा १७ व्या षटकात २६ धावांवर बाद झाला. त्याने ३३ चेंडूच्या आपल्या खेळीत एक चौकार ठोकला. बुमराहने आपला १०० वा सामना खेळत जडेजाला बाद केले.

एकीकडे, ‘तू चल मी आलो’च्या धर्तीवर चेन्नईचे फलंदाज बाद होत होते, दुसरीकडे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आपला क्लास दाखवत होता. गायकवाडने नाबाद ८८ धावांची शानदार खेळी खेळली. यादरम्यान त्याने आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले. यूएईमध्ये गायकवाडचे हे सलग चौथे अर्धशतक आहे. त्याने ५८ चेंडूत नाबाद ८८ धावांची अप्रतिम खेळी खेळली. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि चार षटकार ठोकले. त्याचवेळी ड्वेन ब्राव्होनेही तीन षटकारांच्या मदतीने अवघ्या आठ चेंडूत २३ धावा केल्या. त्याचवेळी ड्वेन ब्राव्होनेही तीन षटकारांच्या मदतीने अवघ्या आठ चेंडूत २३ धावा केल्या.

अॅडम मिल्नेने मुंबईसाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत फक्त २१ धावा देऊन दोन बळी घेतले. याशिवाय ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बामुराहनेही प्रत्येकी दोन बळी घेतले. पण हे दोघेही थोडे महागडे ठरले.