विशांती नाईक आरोंदेकर : संकटांवर मात करणारी स्वयंपूर्णा

आलेल्या संकटांवर मात करुन जिद्दीने आणि कष्टाने स्वयंपूर्ण झालेली विर्नोडा पेडणे इथली विशांती नाईक आरोंदेकर हिची यशोगाथा.

Story: स्वयंपूर्णा । प्रीती केरकर |
18th September 2021, 12:08 am
विशांती नाईक आरोंदेकर : संकटांवर मात करणारी स्वयंपूर्णा

विशांती विश्वनाथ नाईक आरोंदेकर ही पर्वरी गोवा येथील सावळाराम मोरुडकर यांची कन्या. आई सावित्री हि बहिणी व वडिल एका कंपनीत वाहनचालक होते. बारावीचे शिक्षण घेता घेता एका वर्षी तिचे लग्न विर्नोडा पेडणे येथील श्री विश्वनाथ नाईक आरोंदेकर यांच्या सोबत २ मार्च, १९९६ साली झाले. घर एके घर याप्रमाणे दिवस लोटत होते. शेजारी पाजारी राहणाऱ्या काही महिलांनी ३००६ मध्ये श्री रुद्रेश्वर महिला मंडळ स्थापन केले. त्यात विशांती अध्यक्ष पद सांभाळायची. पुढे मंडळाचे रुपांतर SGSY या ग्रामिण योजनेत झाले. या योजनेत BPLसाठी कुकींग कोर्स घेतला गेला होता. या कोर्समध्ये विशांती व तिच्या गटातील सभासदाने सहभाग घेऊन पूर्ण केला. या कार्यशाळेचा अवधी २ महिने होता. त्यानंतर इतर सभासदांबरोबर विशांतीनेपण कॅटरींगच्या ऑर्डर्स घेण्यास सुरुवात केली. गटने कर्ज काढून व्यवसायाला लागणारे साहित्य कर्ज रक्कमेतून खरेदी केल्या.

त्याच बरोबर तिने स्वत:चे फलोत्पादनचे (horticulture) दुकान आपल्या राहत्या घरी उघडले. पती प्रिंटींग प्रेसमध्ये कमाला असल्याकारणाने त्यांना कधी कधी भाजी वितरण करण्यासाठी वेळ नसायचा आणि विशांतीला गाडी चालवता येत नसल्याकारणाने तिला पतीवर अवलंबून राहावे लागायचे. म्हणून त्यांनी मुद्दामहून विशांतीला कार चालवण्यास शिकवली. कार चालवण्यास शिकल्या कारणाने विशांतीला आता कॅटरींगच्या ऑर्डर्स तसेच भाजी वितरण करण्यास फार फार मदत झाली. तीची गाडीमुळे होणारी गैरसोय आता सुटली.

२०१६ मध्ये तिच्या ग्रुपचे पदार्पण पुन्हा DRDA (District Rural Development Agency) NRLM (National Rural District Rural livelihood mission)  या स्त्रीशक्ती योजनेत झाली. यावेळी तिची निवड BRP म्हणून करण्यात आली. तिच्या नेतृत्वाखाली जवळ जवळ २५ हून अधिक सेल्फ हेल्प ग्रुपची स्थापना झाली. त्या ग्रुपांना शेतकी विभागाकडून अळंबी कार्यशाळा तसेच टेल​रिंग, भरतकाम, विणकाम, मायब्रॉन या कार्यशाळांचे कोर्स दिले. ICDS (Integrated Child Development Service) योजनेंतर्गत कुकिंग, सॉफ्ट टॉय, मायक्रॉन यांचे कोर्स घेतले आणि येणाऱ्या काळात जुट बॅगची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ग्रुपकडून कर्ज घेऊन विशांतीने कॅटरींग व्यवसायासाठी लागणारे साहित्य विकत घेतले आणि आपला व्यवसाय स्वतंत्रपणे सुरु केला .

सगळे कसे सुरळीत चालले होते, पण अचानक पतीचे अल्प आजाराने निधन झाल्याकारणाने तिने जगण्याची आशा सोडली. पण आपल्य मुलांना पाहून आपले दु:ख तीने पदरात घातले आणि पुन्हा आपल्या कामाची सुरुवात केली. ह्याच कालावधीत तिला बालवाडीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आंगणवाडी पेडणे येथे ती ‘बालवाडीची बाई’ म्हणून काम करत आहे. दु:खावर दु:ख येत असताना त्यांना हसतमुखाने सामोरे जाण्याचे तिला प्रोत्साहन सेल्फ हेल्प ग्रुपातूनच मिळाले कारण ग्रुपात असल्याकारणाने विविध क्षेत्रातील लोक तिला ओळखू लागले. त्याकारणाने कॅटरिंगचे ऑर्डरी मिळत गेले. आता बीआरपी ह्या पदाचा राजीनामा देऊन ती फक्त सेल्फ हेल्प ग्रुपाची सभासद म्हणून कार्य करत आहे.

(जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा  DRDA यांच्या सौजन्याने)