पुलावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st July 2021, 12:38 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : वेस्टर्न बायपासच्या पुलावर काम करत असताना तोल जाऊन खाली पडलेल्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. महम्मद रहमान (वय ३६) असे या मृत कामगाराचे नाव आहे. हा मगार मूळ पश्चिम बंगाल येथील असून कामानिमित्ताने गोव्यात आला होता. नावेली येथील वेस्टर्न बायपासच्या पुलाचे काम सुरू असताना ही घटना 

घडली. पुलावरून खाली पडल्यानंतर जखमी अवस्थेत महम्मद याला हॉस्पिसिओ इस्पितळात नेण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या कामगाराने उपचारास प्रतिसाद दिला नाही व त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्टेनली गोम्स याप्रकरणी तपास करत आहेत.