बलात्कार प्रकरणी संशयितांचा जामिनासाठी अर्ज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st July 2021, 12:33 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता                  

पणजी : गोव्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून आसामच्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दोन्ही संशयितांनी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी जामीन अर्ज दाखल केला आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी एक दोन दिवसात होणार आहे.    गोव्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून आसामच्या तरुणीवर केपे पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका इमारतीत बलात्कार करण्यात आला होता. तरुणीच्या तक्रारीवरून केपे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.