राकेश अस्थानांच्या विरोधात दिल्ली विधानसभेत ठराव मंजूर


30th July 2021, 10:00 am
राकेश अस्थानांच्या विरोधात दिल्ली विधानसभेत ठराव मंजूर

राकेश अस्थानांच्या विरोधात दिल्ली विधानसभेत ठराव मंजूर
नवी दिल्ली :
पोलीस आयुक्तपदी आयपीएस राकेश अस्थाना यांच्या नियुक्तीविरोधातील ठरावाला दिल्ली विधानसभेने मान्यता दिली आहे. पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करताना सर्वोच्च न्यायालयाने ६ महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असावा असा निर्णय दिला आहे, राकेश अस्थाना यांचा ४ दिवसांचा कार्यकाळ शिल्लक होता असे जैन यांनी म्हटले आहे. आमदार संजीव झा यांनी राकेश अस्थाना यांची नियुक्ती न करण्यासाठी दिल्ली विधानसभेत ठराव मांडला होता.
या ठरावामध्ये गृहमंत्रालयाकडे अस्थाना यांची नियुक्ती मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. गुजरात कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांनी बुधवारी दिल्लीच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून काम पाहणारे राकेश अस्थाना हे तत्काळ प्रभावाने दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी रुजू होतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात सांगितले. अस्थाना हे ३१ जुलैला निवृत्त होणार असताना काही दिवसांपूर्वी ही नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ १ वर्षांचा राहणार आहे.