भारताच्या आजच्या महत्त्वपूर्ण लढती

मनू भाकर, राही सरनोबत पी.व्ही. सिंधूकडून आशा


29th July 2021, 12:27 am
भारताच्या आजच्या महत्त्वपूर्ण लढती

टोकियो : भारताने टोकियो ऑलिम्पिक मोहिमेची जबरदस्त सुरुवात केली होती. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले होते. भारताच्या दुसऱ्या पदकाच्या शोध मोहिमेला गुरुवारी (दि. २९) पुन्हा सुरुवात होईल. सहाव्या दिवशी आर्चर अतानू दास, मनु भाकर, राही सरनोबत आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आपल्या खेळात पदक मिळवण्याच्या दिशेने आगेकूच करतील. भारतीय वेळेनुसार गुरुवारी टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
नेमबाजी : महिला २५ मीटर पिस्तूल इव्हेंटमध्ये राही सरनोबत आणि मनु भाकर. (सकाळी ५.३० वा.)
रोव्हिंग : पुरुष दुहेरी स्कल्स फायनल बी : अर्जुनलाल जाट आणि अरविंद सिंग. (पहाटे ५:२० वा.)
गोल्फ : पुरुषांची फेरी १ : अनिर्बन लाहिरी. (पहाटे ५:२२ वा.)
हॉकी : पुरुष भारत वि अर्जेंटिना पूल ए. (पहाटे ६:०० वा.)
बॅडमिंटन : महिला एकेरी फेरी १६ : पीव्ही सिंधू. (पहाटे ६:१५)
तिरंदाजी : पुरुष वैयक्तिक १/३२ एलिमिनेशन : अतानू दास (सकाळी ७:३१ वा.)
गोल्फ : पुरुष फेरी १ : उदयन माने. (सकाळी ७:३९ वा.)
सेलिंग : मेनस लेझर रेस ७ आणि ८ : विष्णू सरवनन. (सकाळी ८:३५ वा.), ४९ पुरुष तेस ५ आणि ६ : केजी गणपती आणि वरुण ठक्कर (सकाळी ८:४० वा.), महिला लेझर रेडियल रेस 7 आणि 8: नेथ्रा कुमानन. (सकाळी ८:४५ वा.)
बॉक्सिंग : राऊंड ऑफ १६ पुरुष ९१ किलो : सतीश कुमार. (सकाळी ८:४८ वा.), राऊंड ऑफ १६, महिला ५१ किलो : एमसी मार्ट कॉम. (दुपारी ३:३६ वा.)
जलतरण : पुरुष १०० मीटर फुलपाखरू - हिट २ साजन प्रकाश. (दुपारी ४:१६ वा. )