Goan Varta News Ad

केवळ, तात्या होते म्हणून…

Story: तात्यांच्या बाता । दीपक मणेरीकर |
18th July 2021, 12:09 Hrs
केवळ, तात्या होते म्हणून…

चौकात, गप्पांचा फड रंगात आला होता आणि अचानक तात्यांना काहीतरी आठवलं… ते आरामखुर्चीतून उठले, एकवार सर्वांवरून नजर फिरवली व घसा खाकरून म्हणाले, "एकदां काय झाले जाणें…" आता तात्या कुठला किस्सा सांगतात हे ऐकण्यासाठी आम्ही आतूर झालो.. आणि तात्या सुरू झाले…

… " एक दिवस काय झालें जाणें? मी एका महत्त्वाच्या कामासाठी फोंड्यांत गेलेलो.. अर्थातच माझ्या फियाट मधूनच गेलो.. कामं संपतात म्हणेपर्यंत संध्याकाळ झाली. परतीला लागतो म्हणेपर्यंत सहा वाजले. वाटेत त्या काळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त जंगल होतं. आजच्यासारखी गाड्यांची गर्दी नसायची त्यामुळे बिनधास्त वेगात मी गाडी चालवत होतो…. अचानक मला रस्त्याच्या कडेला पडलेला एक माणूस तडफडताना दिसला.. मी गाडी बाजूला थांबवून त्याच्याकडे धाव घेतली..

कपाळमोक्ष होवून, रक्तबंबाळ अवस्थेत तडफडणार्याल त्या माणसाला बहुतेक कुठल्यातरी वाहनाने ठोकरलं होतं.. मी जास्त विचार न करता त्याला उचलून माझ्या गाडीत मागच्या सीटवर झोपवला व भरधाव वेगात सरकारी दवाखाना गाठला… त्या माणसाची तडफड फार वाढली होती.."

" स्ट्रेचरवरून मीच त्याला डॉक्टरांच्या समोर नेला.. नशीबाने, खूप मोठे डॉक्टर त्यावेळी तिथे हजर होते. रुग्णाची भयानक अवस्था बघून डॉक्टरनी त्याला त्वरीत ऑपरेशन थिएटरमध्ये हलवला.त्या अनोळखी माणसाचा कुणीही नातेवाईक तिथे नसल्याने, मी तिथेच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर थांबण्याचा निर्णय घेतला..

काही वेळाने एक परिचारिका बाहेर आली व मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेली. ऑपरेशन टेबलवर झोपलेला रुग्ण आता थोडासा शांत दिसत होता. डॉक्टर मला म्हणाले.. अरे या माणसाची परिस्थिती फार बिकट आहे, याचं जगणं मुश्किल आहे… मी, कारण विचारलं असता डॉक्टर म्हणाले.. "अरे याचं डोकं फुटलं आहे व आत मेंदू दिसत नाहिये.. बहुतेक जिथे अपघात झाला तिथेच कुठेतरी पडला असावा.. " हे ऐकल्यावर त्या बिचार्याब रुग्णाने डोळे विस्फारून आशाळभूतपणे माझ्याकडे बघितलं..

"लगेच येतो. तुम्ही थांबा" असं डॉक्टरना सांगून मी एका झटक्यात तिथून निघालो तो थेट अपघात घडलेल्या ठिकाणी आलो.. गाडीचे दिवे चालू ठेवून आजूबाजूला शोध घेतला असता बाजूच्या झुडपात काहीतरी थरथरतांना दिसलं. बहुतेक हाच मेंदू असावा व त्याची थरथर सुरू आहे म्हणजे तो जिवंत असावा हे मी त्वरीत जाणलं.

अजिबात वेळ न दवडता मी माझं धोतर फाडलं, त्यात तो मेंदू व्यवस्थित गुंडाळून घेतला व गाडीत बसून भरधाव वेगात दवाखाना गाठला.

मेंदूचं गाठोडं घेवून तडक ऑपरेशन थिएटर गाठलं. टेबलावरच्या रुग्णाने, जणू देवदूतच आपल्याला वाचवायला आलाय अशा नजरेने माझ्याकडे बघितलं. मी तो मेंदू डॉक्टरांच्या ताब्यात दिला. त्यांनी जराशी साफसफाई करून लगेच तो रुग्णाच्या डोक्यात बसवला.

रुग्ण नक्की वाचणार अशी हमी डॉक्टरनी दिल्या नंतरच मी घरी यायला निघालो.

त्या माणसाचं नाव आहे महेश. अजून कुठेही भेटला तरी माझ्या पायांवर डोकं ठेवून मला नमस्कार करतो. अगदी भर बाजारातसुद्धा. "

तात्या थोडे थकल्यासारखे वाटले ते हळूहळू चालत खिडकीकडे गेले, तिथे ठेवलेल्या पितळी तांब्यातलं पाणी पेल्यात ओतून घेतलं व घटाघटा प्यायले.

आम्ही बालगोपाळ मंडळी अक्षरशः घामाघूम अवस्थेत तात्यांकडे आ वासून बघत होतो तर वडील मंडळी मिश्कीलपणे एकामेकांना………