सलग १८ तास मॅरेथॉन सूर्यनमस्कार

योग दिनी डॉ. पंकज सायनेकर यांचा नवा विक्रम


22nd June 2021, 01:36 am
सलग १८ तास मॅरेथॉन सूर्यनमस्कार

मॅरेथॉन सूर्यनमस्कार घालून नवा विश्वविक्रम केलेल्या डॉ. पंकज सायनेकर यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व मान्यवर. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : दरवर्षी योगा दिनाला सलग दीर्घकाळ सूर्यनमस्कार घालून नवनवीन विश्वविक्रम प्रस्थापित करून आशियाई बुक ऑफ रेकॉर्ड आणि गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेल्या डॉ. पंकज सायनेकर यांनी यंदा रविवारपासून सोमवारपर्यंत १८ तास ११ मिनिटांत ३ हजार ७३० सूर्यनमस्कार घालून नवा विश्वविक्रम कायम ठेवला. याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक करण्यात आले. सायनेकर यांनी योग विभागात जागतिक रेकॉर्डस युनिवर्सिटी लंडन यांची मानद पदवी प्राप्त केली आहे. २७ मार्च २०१७ रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत १२ तास १५ मिनिटांत २ हजार १५ सूर्यनमस्कार घातले होते. त्याच वर्षी त्यांनी अहमदाबाद येथे २१ जून रोजी १४ तास २५ मिनिटांत २ हजार २९५ सूर्यनमस्कार घातले होते. तसेच पर्वरीत त्यांनी २७ मार्च २०१८ रोजी त्यांनी ४ हजार १४ सूर्यनमस्कारांचा नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. आता त्यांनी सलग १८ तास ११ मिनिटे सूर्यनमस्कार घालून आधीचे विक्रम मोडीत काढले.

हेही वाचा