देशात झाले विक्रमी लसीकरण

धोरण बदलानंतर भारताची विक्रमी कामगिरी; ५० लाख भारतीय सहभागी


22nd June 2021, 01:00 am
देशात झाले विक्रमी लसीकरण

देशात झाले विक्रमी लसीकरण

धोरण बदलानंतर भारताची विक्रमी कामगिरी; ५० लाख भारतीय सहभागी

नवी दिल्ली : 

नवी दिल्लीः नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार करोनावरील लसीकरण सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी ८० लाखांहून अधिक नागरिकांना डोस देण्यात आला. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येत नागरिकांचे लसीकरण करण्याचा हा नवा विक्रम आहे. यापूर्वी ५ एप्रिलला ४३ लाख नागरिकांना करोनावरील लसीचा डोस देण्यात आला होता. 

भारतामध्ये एका दिवसात ५० लाखांहून अधिक जणांना लसी देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश गुजरात आणि हरयाणा या भाजपची सत्ता असणार्‍या राज्यांमध्येच एकूण लसीकरणापैकी २६ लाख लसी देण्यात आल्या आहेत.कोविन अ‍ॅपनुसार सोमवारी सर्वाधिक लसीकरण हे मध्य प्रदेशात झाले. राज्यात १४.७१ लाख नागरिकांना लस दिली गेली. यानंतर कर्नाटकमध्ये १०.३६ लाख आणि उत्तर प्रदेशात ६.५७ लाख नागरिकांना डोस देण्यात आला. दिल्ली ही संख्या ७६,१०२ इतकी आहे.

विक्रमी लसीकरण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. आजचे विक्रमी लसीकरण म्हणजे आनंदची गोष्ट आहे. करोनाविरोधी लढाईत लसीकरण हे आपले सर्वांत मोठे शस्त्र आहे. ज्यांनी लस घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. ज्यांनी नागरिकांना लस दिली त्या सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचेही अभिनंदन, असे पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर म्हटले आहे.