आसामातील काँग्रेस आमदाराचा राजीनामा

राहुल गांधी हे पक्षाचे नेतृत्त्व करण्यास असमर्थ आहेत. त्यांच्याकडे सुत्रे राहिली तर पक्ष वाढू शकणार नाही, अशी बोचरी टीका करत काँग्रेसचे आसाममधील आमदार रूपज्योती कुर्मी यांनी शुक्रवारी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ते २१ जून रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

Story: गुवाहाटी : |
19th June 2021, 01:34 am
आसामातील काँग्रेस आमदाराचा राजीनामा

गुवाहाटी : राहुल गांधी हे पक्षाचे नेतृत्त्व करण्यास असमर्थ आहेत. त्यांच्याकडे सुत्रे राहिली तर पक्ष वाढू शकणार नाही, अशी बोचरी टीका करत काँग्रेसचे आसाममधील आमदार रूपज्योती कुर्मी यांनी शुक्रवारी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ते २१ जून रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
रुपज्योती कुर्मी म्हणाले, मी काँग्रेस सोडत आहे; कारण पार्टी हायकमांड आणि गुवाहाटीमधले नेते केवळ ज्येष्ठ नेत्यांनाच प्राधान्य देतात. आम्ही त्यांना सांगितले होते की काँग्रेसला यंदा निवडणूक जिंकण्याची चांगली संधी आहे. आपण ‘एआययूडीएफ’सोबत आघाडी करू नये, ती चूक ठरेल; आणि ती चूक ठरली. काँग्रेस पक्षात तरुण नेत्यांचे म्हणणे ऐकले जात नाही. म्हणून काँग्रेसची सर्व राज्यांमध्ये वाईट अवस्था झाली आहे. राहुल गांधी पक्षाचे नेतृत्व करू शकत नाहीत. ते केंद्रस्थानी असतील, तर पक्ष पुढे जाऊ शकत नाही. कुर्मी यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षविरोधी कारवाया करण्याच्या आरोपात त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. रुपज्योची कुर्मी हे आसामच्या जोरहाट जिल्ह्यातल्या मरियानी मतदारसंघातून निवडून आले आहेत.