जसे बघावे तसे जग दिसते

काहीजण आपलाच मुद्दा कसा बरोबर आहे, हे पटवून द्यायला जातात तेव्हा विसंवाद निर्माण होतो. जर माणूस त्याचे अनुभव आणि परिस्थितीमुळे घडत असेल तर त्याची मते व वागणे त्यानुसार असते हे तथ्य स्वीकारले तर त्याच्यावर आपली मते लादणे दृष्ट ठरत नाही.

Story: विचारचक्र । सुरेखा दीक्षित |
19th June 2021, 12:31 am

संपूर्ण सृष्टी वैविध्याने नटलेली आहे. ऋतुमानानुसार ती आपले रंग, रूप बदलत असते. निसर्गाच्या विविध रंगीबेरंगी छटा आपल्याला बघायला मिळतात. निरखून बघितले की अचंबित व्हायला होते. प्रत्येकाला एकच दृश्य निरनिराळे भासते. वस्तुत: दृश्यमान जग तेच असते पण ते बघणाऱ्याच्या दृष्टीकोनानुसार त्याला दिसते. माणूस दु:खी असेल तर सभोवताली उदासीनतेच्या लहरी जाणवतात, प्रफुल्लित असले तर अगदी बालकवींच्या ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ’ भावतरंग मनावर उमटतात. आपण जगाकडे बघू तसे जग दिसते वा भासते. याची प्रचीती देणारा प्रसंग माझ्या जीवनात घडला, तो लिहिण्याचा मोह टाळता येत नाही. चार-पाच वर्षांपूर्वी माझी पुतणी गोव्याला घरगुती समारंभासाठी आली होती. इंजिनियर पुतणी व तिचे पती बंगलोरच्या वास्तव्याला निरोप देऊन कॅनडाला जाणार होते. जाण्याआधी तिने छंद म्हणून स्वत: बनवलेली पेंटिग्ज प्रत्येकाला दिली. निरोप घेण्याआधी सगळी चित्रे माझ्या जावेकडे सुपूर्द केली. समारंभानंतर मी बाहेरगावी गेल्याने परतल्यानंतरच मला त्याबद्दल कळले. सर्वांची चित्रे वाटून झाल्यावर दोनच उरलेली, त्यातील एक पेंटिग मला निवडायचं होतं. कॅनव्हासवर चितारलेली आयताकृती एक कलाकृती मला आवडली जी उभी ठेवलेली होती. चित्र कशाचे आहे कळत नव्हते. मी व माझ्या जावेने त्यावर बरीच चर्चा केली आणि ‘काहीतरी माॅडर्न आर्ट आहे, आपल्याला त्यातले काही कळत नाही’ या निष्कर्षाप्रत पोचलो. बघता बघता अचानक ते चित्र आडवे धरले अन् क्षणार्धात डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो डोळे मिटून ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा अर्धा भाग होता. आजूबाजूला काही आॅर्किडची फुले रंगवलेली होती. आम्ही दोघीही हसायला लागलो. इतका वेळ चित्रावरची निर्स्थक चर्चा व अनाकलनीय म्हणून केलेला काथ्याकूट फोल ठरला होता. चित्राचा कोन बदलल्यावर क्षणात स्पष्टता आली होती. दृष्टिकोनात बदल केल्यामुळे ही जादू झाली होती आणि हा अनुभव प्रत्यक्ष साकार झाला होता.

जीवनाचेही तसेच आहे. आपले विचार, भावना, मते, दृष्टीकोन जसा असले तसे सभाेवतीचे जग भासते. दृष्टीकोन कसा तयार होतो. याबाबत ‘you are the placebo’ चे लेखक डाॅ. ज्यो डिस्पेंझा म्हणतात, ‘‘your thoughts come from your past memories if you think and feel a certain way, you begin to create an attitude, An attitude is a cycle of short term thoughts and feelings experienced over and over again,’’ थोडक्यात आपल्या पुर्वानुभवातून, आठवणींतून विचार किंवा भावना उत्पन्न होतात. सतत एकाच प्रकारच्या विचार अन् भावनांमुळे मत तयार होते, जे आपल्या अस्तित्वाचा भाग बनते. अशा अनेक मतांची शृंखला सुप्त मनात रूजली जाते आणि नंतर दृष्टिकोनात परिवर्तित होते. दृष्टीकोन जीवनात प्रत्येक गोष्टीची निवड करताना, वागताना, नातेसंबंधांमध्ये आणि वास्तवाला सामोरे जाताना, आपली प्रभावी छाप टाकतो. दैनंदिन जीवनात विभिन्न दृष्टीकोन असलेल्या अनेक व्यक्तींशी आपला संबंध येतो, काहीजण आपलाच मुद्दा कसा बरोबर, पटवून द्यायला जातात. तेव्हा विसंवाद निर्माण होतो. जर माणूस त्याचे अनुभव आणि परिस्थितीमुळे घडत असेल तर त्याची मते व वागणे त्यानुसार असते हे तथ्य स्वीकारले तर त्याच्यावर आपली मते लादणे दृष्ट ठरत नाही. परंतु बहुतांशी लोक या पातळीवर निसरतात. टिव्ही चॅनेलवरील राजकीय चर्चा बघितली की कळते की एकाच मुद्यावरून निरनिराळ्या राजकीय वा सामाजिक पार्श्वभूमीचे लोक आपली बाजू मांडताना कसे घसरतात. ते आपलाच एका चालवणाऱ्या व्यक्ती कुटुंबात वा समाजातही नकोशा होतात मी जसा माझी भूमिका, मते, श्रद्धा, दृष्टीकोन यांवर ठाम आहे, तोच अधिकार इतरांनाही आहे ही ही मूलभूत गरज परस्पर संबंधांमध्ये मान्य केली तर मतभिन्नता असूनही मनभेद होत नाहीत.

व्यक्ती तितक्या प्रकृती हे सर्वार्थाने खरे आहे. जरा सभोवताली नजर टाकली की प्रत्येकातील वेगळेपण लक्षात येते. प्रत्येकाने काही वैशिष्ट्य असते, व्यक्ती केवळ दिसण्यातच वेगळ्या नसतात तर त्यांचे वागणे, स्वभाव, मते, आस्था सगळं काही निराळ असतं, एखासारखा दुसरा नसतो. बाहेरच नव्हे तर आपल्या कुटुंबातही भिन्न-भिन्न दृष्टिकोनांची माणसं एकाच छताखाली नांदतात. घरातील व्यक्तींनी आपली मते दुसऱ्याने मान्य करावीत यासाठी अदृहास तेला की भांड्याला भांड लागतं आणि नाद होतो. घरातील रूसवे-फुगवे, भांडणं लवकर मिटतात कारण घरात एकत्र राहणाऱ्या माणसांचे आपसात प्रेम व जिव्हाला असतो. हाच स्नेहभाव सार्वजनिक जीवनात का दाखवू नये? काही सामाजिक संस्थांमध्ये तोच सर्वांना एकत्र बांधण्याचा मुख्या धागा असतो.

समाजात वावरताना इतरांचा सन्मान जपत जुवळून घ्यावे लागते. त्याचबरोबर स्वत:चा स्वाभीमानही राखावा लागतो. आपले विचार बदलेले की सर्व साध्य होतं. जो मनुष्य सतत अंतर्मुख होऊन स्वत:च्या मनाचा वेध घेत राहतो. अंतरंगात डोकावून भावनांचा अन् विचारांचा मागोवा घेतो. नेहमी आत्मपरीक्षण करतो, त्याला त्याचे विचार बदलता येतात. त्रस्त करणाऱ्या भावनांचा गुंता इतरांबद्दलच्या संवदेना वागणे कसे होते हे बघितले तर लक्षात येते की आपण खूप बदललो आहोत, अधिक परिपक्व झालो आहोत. तारूण्यात जीवनाकडे बघण्याची जी दृष्टी होती तिच्यात प्राैढत्वाकडे झुकल्यानंतर बदल झाला आहे. ‘हम बदले सो जग बदले’ याची प्रचीती येते.

डाॅ. आनंद नाडकर्णी त्यांच्या ‘स्वभाव - विभाव’ पुस्तकाच्या मला माझ्याबद्दल काय वाटते? प्रकरणात लिहितात, ‘माझ्या सुखाचं आणि दु:खाचं या दोन्ही भावनांचं मूळ माझ्या दृष्टिकोनात आणि आत्मभानातच असतं, त्यासाठी दुसरी कोणती व्यक्ती वा परिस्थिती, जबाबदार नसते. या सर्वाचा असलाच तर फक्त सहभाग असतो. माझ्या प्रमाणेच इतरांनाही आत्मभान आहे हे सूत्र ध्यानात ठेवलं तर प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्य आहे या निष्कर्ष्मप्रत आपण पोचतो. टोकाची, ताठर भूमिका घेऊन माणसांना तोडण्यात काही हशील नाही. समान विचारधारेचे लोक संघटनांमध्ये एकमेकांना साथ देत निश्चित ध्येयप्राप्तीसाठी झटतात. विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी त्यांना परस्परांशी जुळवून घ्यावं लागतं. किंबहुना मनात समर्पण, त्याग, सेवा, सहकार्य इत्यादी उदान्न भावनांना जागृत करावं लागतं. प्राचीनकाळी संंघभावनेने आश्रमात राहणाऱ्या ऋषिमुनींनी रचलेल्या प्रार्थना यासाठी प्रेरक आणि मनोज्ञ आहेत.ऋग्वेदातील दहाव्या अध्यायातील वेदमंत्र या काळातही अनुसरण्यासारखे आहेत. ‘सहनाववतु सह नाै भुनक्तु’ मधील गुरू - शिष्यांमधील आवाहन किती व्यापक आहे! त्यापुढील ‘संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम् हा एेक्यमंत्र बघा. आम्ही सगळे एकत्र वाटचाल करू, एकत्र संवाद करू आमचे सर्वांचे मन एकसारखे असू दे. प्राचीन काळी देवतांचे असे आचरण होते म्हणूनच ते वंदनीय आहेत. जे एकत्र काम करतात त्याचा मंत्र एक सारखा असतोच असतो, म्हणजे ते एकमेकांशी सल्ला मसलत करून निर्णयापर्यंत पोहोचतात. असा प्रकारच्या भाव अ,सेस्या वैश्विक एकात्मता मंत्रांचे अर्थ समजून एकसुशन पठन केले की हृदयात सर्वसमावेशक स्पंदने स्फुरतात. मन विशाल होते, ते इतके व्यापक होते की संपुर्ण चराचर सृष्टीचे कल्याण व्हावे हा दृष्टिकोन अधिक दृढ होतो. सभोवतीचे जग नव्या चैतन्याने साकार होते. माणुस उन्नत व्हायला लागतो. विकास, प्रगती, उन्नती हेच तर अपेक्षित आहे मानवतेला.