कोव्हाव्हॅक्स लस लवकरच येणार : पूनावाला


17th June 2021, 12:59 am
कोव्हाव्हॅक्स लस लवकरच येणार : पूनावाला

अदर पूनावाला

नवी दिल्ली : करोनाविरोधी लढ्यात भारत सरकारला कोव्हाव्हॅक्स लसीच्या स्वरूपात लवकरच आणखी एक शस्त्र मिळणार आहे. ही लस करोनापासून शंभर टक्के सुरक्षा प्रदान करणारी आहे, असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे. या लसीची वैद्यकीय चाचणी आता अंतिम टप्प्यात आहे. भारतीय औषध महानियंत्रकांकडून लवकरच परवानगी मिळू शकते. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत ही लस भारतात येईल. भारतात या लसीची आणखी एक चाचणी घेतली जाईल. नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असे पूनावाला यांनी सांगितले. दरम्यान, सध्या देशात सीरमची कोव्हिशिल्ड, भारत बायाेटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक व्ही या लसींचा वापर केला जात आहे.