Goan Varta News Ad

मालाड दुर्घटना; ११ जणांचा मृत्यू

|
11th June 2021, 12:50 Hrs

मालाड दुर्घटना; ११ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : 

मुंबईतील मालाड मालवणी भागात बुधवारी रात्री उशिरा एक इमारत दुसर्‍या इमारतीवर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ११ जणांनी घटनास्थळीच आपले प्राण गमावले तर १७ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केलाय. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या घटनेवर दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. ’मुंबईत मालाड पश्चिम इथे इमारत दुर्घटनेतील जीवीतहानीमुळे तीव्र दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो’ असे म्हणत पंतप्रधानांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मुंबईत मालाड पश्चिम इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून प्रत्येकी २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे’ असंही या ट्विटमध्ये म्हटले आहे.