म्हापशात २ किलो गांजा जप्त, एकाला अटक

जप्त केलेल्या अमलीपदार्थाची किंमत १ लाख ९० हजार रुपये


06th May 2021, 11:57 pm
म्हापशात २ किलो गांजा जप्त, एकाला अटक

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : येथील गांधी चौक येथे म्हापसा पोलिसांनी दिलीप राघवजी रत्नानी (६०, रा. मुलूंड -मुंबई) याला अटक केली. त्याच्याकडून १ लाख ९० हजार रुपयांचा १ किलो ९०० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी दुपारी १२.३० ते सायंकाळी ४.३० च्या दरम्यान करण्यात आली.
गुरुवारी दुपारी गांधी चौक येथे संशयित मादकपदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आशिश पोरोब, विराज कोरगावकर, हवालदार सुशांत चोपडेकर, इर्शाद वाटांगी, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर व अक्षय पाटील यांनी सापळा रचून संशयितास पकडले. झडतीवेळी त्याच्याजवळ वरील वजनाचा गांजा सापडला. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली पोलिसांनी संशयितास अटक केली. संशयित आरोपी रेल्वे मार्गे गुरुवारीच गोव्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.