खुनी हल्ला : संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला

गुंड अन्वर शेख याच्यावर खुनी हल्ला केल्या प्रकरणी संशयित सुदन डिकॉस्टा याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता.


06th May 2021, 11:53 pm
खुनी हल्ला : संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : गुंड अन्वर शेख याच्यावर खुनी हल्ला केल्या प्रकरणी संशयित सुदन डिकॉस्टा याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज गुरुवारी खंडपीठाने फेटाळून लावला आहे.
गुंड अन्वर शेख याच्यावर १६ फेब्रुवारी रोजी फातोर्डा आर्लेम सर्कलनजीक खुनी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात रिकी होर्णेकर, विपुल पट्टारी यांच्यानंतर इम्रान बेपारी, विजय कारबोटकर, हर्षवर्धन सावळ, सुदन डिकॉस्टा व महेंद्र तानावडे या संशयितांना कोल्हापूर येथून फातोर्डा पोलिसांनी अटक केली होती. अन्वर शेख हल्ला प्रकरणाची मडगावातील प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी सुरू आहे. संशयित विजय कारबोटकर, सुदन डिकॉस्टा, महेंद्र तानावडे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. महेंद्र तानावडे याला खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला, तर इतर दोघांनी खंडपीठात दाखल केलेले अर्ज मागे घेतले. त्यानंतर फातोर्डा पोलिसांनी फरार असलेले संशयित व्हॅली डिकॉस्टा, अमीर गवंडी यांना अटक केली होती. संशयित सुदन डिकॉस्टा याने दुसऱ्यांदा खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला. हा अर्जही खंडपीठाने गुरुवारी फेटाळून लावला.