स्टुअर्ट मॅकगिल अपहरण प्रकरणी चौघांना अटक


05th May 2021, 11:36 pm

सिडनी : माजी कसोटीपटू स्टुअर्ट मॅकगिलचे शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन पोलिसांनी बुधवारी (दि.५) चार जणांना अटक केली. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी या चारही जणांना सिडनी येथे छापा टाकून अटक केली.
पोलिसांनी सांगितले की १४ एप्रिलला पन्नास वर्षीय मॅकगिल याचा तीन जणांशी सामना झाला होता. त्यावेळी या तीन जणांनी मॅकगिल याचे हात-पाय बांधून त्याला गाडीत घातले. त्यानंतर शहराबाहेर एका तासाच्या अंतरावर असलेल्या एका घरात नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच शस्त्राचा धाक दाखवून धमाकवण्यात आले. तासभर त्रास दिल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.
पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केल्यानंतर स्ट्राईक फोर्स आणि दंगल विरोधी अधिकाऱ्यांनी चार लोकांना अटक केली असून चारही जणांवर आरोप निश्चित करण्याचे काम सुरू आहे.