सध्याच्या दरांत दोन ते पाच हजार कमी; आदेश जारी
पणजी : खासगी इस्पितळांत कोविड रुग्णांवरील उपचारांचे दर राज्य सरकारने शुक्रवारी निश्चित केले. सध्या असलेल्या दरांत सरकारने दोन ते पाच हजार रुपये कमी केले आहेत. आरोग्य खात्याचे अतिरिक्त सचिव विकास गावणेकर यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
प्रवेश शुल्क, इंटेन्सिविस्ट, प्राथमिक आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, बेड, परिचारिका, निवासी डॉक्टर, भोजन, कर्मचाऱ्यांसाठी पीपीई कीट, एक्सरे, ईसीजी, यूएसजी, कार्डियाक मॉनिटर, इन्फूशन पंप, लिव्हर फंक्शन टेस्ट, रक्तटगट, दररोजची औषधे, व्हिटॅमिन सी, डी आदींसारख्या उपचारांच्या खर्चाचा यात समावेश असणार आहे.
डायग्नोस्टिक इंटर्वेन्शन, विशेष औषधे, विशेष वापराची उपकरणे, सर्जरी तसेच अतिरिक्त ऑक्सिजन व आयसीयू या सुविधांसाठी रुग्णांना वेगळा खर्च करावा लागेल, असेही आदेशात म्हटले आहे.
असे असतील दर (प्रति दिवस)
उपचार सध्याचे दर नवे दर
सर्वसामान्य प्रभाग १०,००० ८,०००
ट्विन शेअरिंग १३,००० १०,४००
खासगी रुम (सिंगल) १६,००० १२,८००
आयसीयू व व्हेंटिलेटर २४,००० १९,२००