पश्चिम बंगालात सहाव्या टप्प्यात ७९.०९ टक्के मतदान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. सहाव्या टप्प्यात चार जिल्ह्यांतील ४३ विधानसभा मतदारसंघांतून ७९.०९ टक्के मतदान झाले.

Story: कोलकाता : |
23rd April 2021, 01:16 am
पश्चिम बंगालात सहाव्या टप्प्यात ७९.०९ टक्के मतदान

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. सहाव्या टप्प्यात चार जिल्ह्यांतील ४३ विधानसभा मतदारसंघांतून ७९.०९ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची घोषणा केली आहे. दक्षिण दिनाजपूर भागातील एका सभेत जनतेला संबोधित करताना कोरोना लस मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले. ५ मेपासून राज्यातील १८ वर्षांवरील पात्र असणाऱ्या सर्वांना कोरोना लस पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे, असे बॅनर्जी यांनी जाहीर केले.