Goan Varta News Ad

नवे लोकायुक्त जोशींना नियुक्तीचे पत्र प्रदान

राज्यपालांच्या संंमतीने शपथविधीचा दिवस निश्चित करण्यात येणार

|
23rd April 2021, 12:43 Hrs
नवे लोकायुक्त जोशींना नियुक्तीचे पत्र प्रदान

फोटो : अंबादास जोशी
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : नवे लोकायुक्त अंंबादास जोशी यांच्या नियुक्तीला राज्यपालांंनी मान्यता दिली आहे. जोशी यांना सरकारकडून नियुक्तीचे पत्र देण्यात आले. अंंबादास जोशी यांना लोकायुक्त म्हणून नियुक्त करण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. राज्यपालांच्या संंमतीने शपथविधीचा दिवस निश्चित करण्यात येणार आहे. शपथविधीचा दिनांक अद्याप ठरलेला नाही.
मागील वर्षी पी. के. मिश्रा निवृत्त झाल्यापासून गोव्याचे लोकायुक्तपद रिक्त आहे. नव्या लोकायुक्त पदासाठी योग्य व्यक्ती मिळावी यासाठी सरकारने कायद्यात दुरुस्ती केली. पात्रतेची अट शिथील केली. या पदासाठी सरकारने निवृत्त न्यायाधीश यू. व्ही. बाक्रे यांची निवड केली होती. त्यांनी लोकायुक्तपद स्वीकारण्यास नकार दिल्याने अंंबादास जोशी यांची निवड सरकारने केली. अंंबादास जोशी हे मुंंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत.