मनमोहन सिंग यांचे मोदींना पत्र

- करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पाच कलमी कार्यक्रमाचा सल्ला

Story: दिल्ली : |
19th April 2021, 12:58 am
मनमोहन सिंग यांचे मोदींना पत्र

दिल्ली : देशातील करोना संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी मोदी सरकारला करोनाविरोधात लढाईसाठी पाच कलमी कार्यक्रमाचा सल्ला दिला आहे. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे की, लसीकरणाची गती आणखी वाढवावी लागेल. कारण करोनाविरोधातील लढाईसाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. किती लोकांचे लसीकरण झाले आहे ही संख्या न पाहता, यावर लक्ष केंद्रीत केले जावे की लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना लसीकरण झाले आहे. याशिवाय ४५ वर्षांहून कमी वयाच्या लोकांना देखील लसीकरणात सूट दिली जावी.
तसेच, सरकारने हे सांगायला हवे की विविध लसींबाबत काय आदेश आहेत आणि पुढील सहा महिन्यांमध्ये पोहोचण्याबाबत काय परिस्थिती आहे? आता भारत परदेशातूनही लस खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, याबाबतची आता काय स्थिती आहे?
मनमोहन सिंग असे देखील म्हणाले की, सरकारने असा संकेत द्यायला हवा की, पारदर्शी फाॅर्म्युल्याच्या आधारावर राज्यांमध्ये त्यांना अपेक्षित पुरवठ्याचे कसे वितरण केले जाईल? याशिवाय, राज्यांना फ्रंटलाईन वर्कसची श्रेणी ठरवण्यासाठी सूट द्यायला हवी. ज्यामुळे ४५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना देखील लस देता येईल. भारत सरकारने लस निर्मात्यांना आणखी सवलती द्यायला हव्यात. कोणत्याही लसीला जिला युरोपिय मेडिकल एजन्सी किंवा यूएसएफडीए सारख्या विश्वसनीय एजन्सीद्वारे वापरासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, तिचा घरेलू आयात केल्यावर उपयोग केला गेला पाहिजे.
....................................................................................
पाच कलमी कार्यक्रम असा...
१. पुढील सहा महिन्यांसाठी किती लसींची ऑर्डर दिली आहे, हे जाहीर करावे.
२. राज्यांना अपेक्षित असेलेला साठा कसा पुरवला जाईल, याबाबत माहिती द्यावी.
३. राज्यांना ‘फ्रंटलाईन वर्कस’ची श्रेणी ठरवण्यासाठी सूट द्यायला हवी.
४. लस निर्मात्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी सवलती द्याव्यात.
५. वापरासाठी परवानगी दिल्या गेलेल्या कुठल्याही लसीच्या आयातीसाठी परवानगी द्यावी. 

हेही वाचा