उसप-डिचोली येथे उद्यापासून क्रिकेट स्पर्धा


15th April 2021, 12:11 am

केरी-सत्तरी : अॅथलेट्स स्पोर्ट्स क्लब उसप डिचोलीतर्फे पहिली अखिल गोवा पातळीवरील पंचायत व नगरपालिका मर्यादित हेवीबॉल क्रिकेट सामना शुक्रवार, दि. १६ रोजीपासून लाटंबार्से आयडीसी उसप आमठाणे धरणाजवळ आयोजित करण्यात आला आहे.
सदर स्पर्धा १७ व १८ एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहे. त्यानंतर उपांत्य व अंतिम फेरी दि. २५ एप्रिल रोजी खेळविली जाणार आहे. प्रथम येणाऱ्या २४ संघांनाच प्रवेश दिला जाईल. विजेत्या संघास रु. ३० हजार व चषक व मॅन ऑफ द सिरीज, उपविजेत्या संघास रु. १५ हजार व चषक व मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु. २५०० असून ते रोख किंवा जीपे क्र. ९१४५५३०३१७ किंवा ७०३०३११४७८ वर करावे. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
आयोजक स्पर्धेत बदल करू शकतात. फक्त कप्तानालाच आयोजकांकडे बोलण्याचा अधिकार असेल. खेळाडूंना ट्रॅकपँट आणि शूज अत्यावश्यक आहेत. अधिक माहितीसाठी दत्ताराम ७०३०३११४७८, अक्षय ९९२३५३०७९९, सुशांत ७५०७६३७०७३ किंवा रामा ९१४५५३०३१७ यांच्याशी संपर्क साधावा. माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये, होंडा ग्राम पंचायत सरपंच आत्मा गावकर, शिवकृपा ट्रान्सपोर्ट मालक आझू गावकर व इतर मान्यवर यांचे सहकार्य लाभले आहे.