हरमल क्रिकेट स्पर्धेत एव्ही ब्रदर्स विजयी


15th April 2021, 12:11 am

हरमल : येथील महापुरुष क्लब आयोजित आंतर वॉर्ड क्रिकेट स्पर्धेत संजय वॉरियर्स संघाचा पराभव करून एव्ही ब्रदर्स संघाने स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. या स्पर्धेत ८ संघांनी भाग घेतला होता. विजेत्या संघास रोख रु. पाच हजार व स्व. कल्याणी व स्व. रघुवीर नाईक स्मृती चषक तसेच उपविजेत्यास रोख रु. तीन हजार व स्व. कल्याणी व स्व. रघुवीर नाईक चषक देण्यात आले. वैयक्तिक गटात दिनेश गडेकर (सामनावीर), अभिषेक कुडव (उत्कृष्ट फलंदाज), बबन कुडव (उत्कृष्ट गोलंदाज), महेश सावंत (मालिकावीर) बक्षिसे देण्यात आली.
बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे कृष्णा (नाना) रघुवीर नाईक, तर संजय पॉल ग्रँड वाटिकाचे संचालक, उपनिरीक्षक दिनेश गडेकर, तुकाराम कुडव उपस्थित होते. खेळाडूंनी तंदुरुस्त राहण्यास नियमित व्यायाम करणे गरजेचे बनले आहे. एखादी स्पर्धा आयोजित करणे सोपे असते. मात्र, निभावताना खूप अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढणे गरजेचे असते. महापुरुष संघाने चांगल्या प्रकारे आयोजन करून युवा खेळाडूंना संधी दिली तसेच याहीपुढे आपल्याकडून आवश्यक सहकार्य असल्याचे प्रतिपादन समाजकार्यकर्ते कृष्णा नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी संजय पॉल, तुकाराम कुडव यांची भाषणे झाली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. सूत्रनिवेदन व आभार दीपक गडेकर यांनी केले.