वाळपई प्रभाग आठमध्ये निर्मला साखळकर बिनविरोध


06th March 2021, 11:58 pm
वाळपई प्रभाग आठमध्ये निर्मला साखळकर बिनविरोध

फोटो : बिनविरोध निवड झाल्यानंतर निर्मला साखळकर यांना पत्र देताना निवडणूक अधिकारी राजेश आजगावकर. 

प्रतिनिधी । गोवन वार्ता

वाळपई : नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमधून निर्मला महेश साखळकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना निवडणूक अधिकारी राजेश आजगावकर यांनी अधिकृत पत्र दिले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. हा प्रभाग महिला ओबीसीसाठी आरक्षित होता. प्रभागातून निर्मला साखळकर यांचा एकमेव अर्ज सादर झाला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शनिवार शेवटचा दिवस होता. छाननी प्रक्रियेत अर्ज वैध ठरल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. माजी नगराध्यक्ष अख्तर शहा यांच्या योगदानामुळे आपण बिनविरोध निवडून आल्याचे त्यांनी सांगितले.