मडगाव पालिकेसाठी १२८ अर्ज दाखल : ज्योतीकुमारी

अर्ज छाननी उद्या : एकूण १११ उमेदवारांकडून अर्ज सादर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th March 2021, 11:24 pm

मडगाव : मडगाव पालिका निवडणुकीतील नगरसेवकांच्या २५ जागांसाठी १११ उमेदवारांकडून १२८ अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी ज्योतीकुमारी यांनी दिली. २७ फेब्रुवारी रोजी एक अर्ज, शुक्रवारी ३८ व शनिवारी शेवटच्या दिवशी ८९ अर्ज दाखल झालेले आहेत. प्रभाग क्र. ९ मधून सर्वाधिक ९ अर्ज, तर प्रभाग १६, १७, १९, २१, २२ मधून प्रत्येकी दोन अर्ज सादर झालेले आहेत. सोमवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याचेही ज्योतीकुमारी यांनी सांगितले.
मडगाव पालिकेच्या नगरसेवकांच्या २५ जागांसाठी १११ उमेदवारांकडून एकूण १२८ अर्ज सादर झालेले आहेत. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ८५ उमेदवारांकडून एकूण ८९ अर्ज भरण्यात आले. प्रभाग १ मधून मॅकेन्झी डिकोस्टा, मिलाग्रीस फर्नांडिस, क्लारा फर्नांडिस, जोन्स फान्सिस्को अग्नेलो डॉमनिक, रेंझिल मास्कारेन्हास, रेबेलो लुईस गोंझगा जुडास या सहा उमेदवारांकडून ९ अर्ज सादर करण्यात आलेले आहेत. प्रभाग २ मध्ये क्रास्तो जुआव निकोलस, कालिदास नाईक, वासुदेव विर्डीकर यांनी चार अर्ज सादर केले आहेत. प्रभाग ३मधून फातिमा बर्रेटो, झिको फर्नांडिस, लिंडन परेरा, रेश्मा सय्यद, सेउला वाझ, डिवीया वाझ यांनी अर्ज भरले आहेत. प्रभाग ४मधून फान्सिस्को बार्बाेसा, मेल्शॉन डायस, आलेक्स फालेरो, निमेसिया फालेरो, पीटर फर्नांडिस यांनी, प्रभाग ५मधून आर्थुर डिसिल्वा, आविका डिसिल्वा, आग्नेलो फुर्तादो, सुजय लोटलीकर यांनी अर्ज भरले. प्रभाग ६मधून प्रवीण नाईक, बबिता नाईक, विराज नाईक, सदानंद नाईक यांनी, प्रभाग ७मधून केनिशा बार्बाेसा, ज्योकिना डायस, मझिना डायस, मिलाग्रीना गोम्स, लेल्सी वाझ यांनी अर्ज भरले. प्रभाग ८साठी कामिलो बर्रेटो, लिवरामेंता बर्रेटो, आशा गावस, प्रताप करमळी, गजानन करमळी, मिलाग्रीस नरोन्हा, अदीश उसगावकर यांनी अर्ज सादर केले. प्रभाग ९साठी कामिलो बर्रेटो, लिवरामेंता बर्रेटो, विद्येश कुंडईकर, नर्मदा कुंडईकर, आगुस्तिन मिरांडा, रवींद्र नाईक, मॅन्युअल ऑलिवेरा, आंतानिओ परेरा, अँजेलिस परेरा अशा सर्वाधिक ९ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. प्रभाग १०साठी ग्लेन आंद्रादे, पंकज देसाई, फान्सिस्को फर्नांडिस, महादेव हजारे, तेरेझिन्हा नरोन्हा यांनी, प्रभाग‍‍ ११साठी जया आमोणकर, सिद्धी मिरजकर, रितिका नाईक, रश्विता नाईक, प्रिया नाईक, वंदना रावणे, संकिता सावंत देसाई यांनी, प्रभाग १२साठी व्लेम फर्नांडिस, सगुण नाईक, शर्मद रायतूरकर यांनी, प्रभाग १३साठी केतन कुडतरकर, गोपाळ नाईक, विजेंद्र नाईक, हनुमंत सुतार यांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग १४साठी यश आजगावकर, राजेंद्र आजगावकर, रोशन बोरकर, फबियन कुतिन्हो, दामोदर नाईक, सिल्वा लोबो नॉर्टन जोस गॉडफी गॅस्पर यांनी अर्ज भरले आहेत. प्रभाग १५साठी महेश आमोणकर, वेरेन डिसिल्वा, उदय देसाई, मनोज मसुरकर, इफ्तिहार शेख यांनी, प्रभाग १६साठी अनिशा नाईक, दीपाली सावळ यांनी, प्रभाग १७साठी सीताराम गडेकर, रूपेश महात्मे, प्रभाग १८साठी रोहन नाईक, पराग रायकर, विनय शिरोडकर यांनी, प्रभाग १९साठी मंगला हरमलकर, लता पेडणेकर यांनी अर्ज दाखल केले. प्रभाग २०साठी शामिन बानो, सँड्रा फर्नांडिस, नवनीता केरकर, पोमा केरकर, अलिंडा रॉड्रिग्ज यांनी अर्ज सादर केले आहेत. प्र‍भाग २१साठी दामोदर सातार्डेकर, दामोदर शिरोडकर यांनी, प्रभाग २२साठी प्रभव नाईक, घनश्याम प्रभू शिरोडकर यांनी, प्रभाग २३साठी सुगंधा बांदेकर, रोशल फर्नांडिस, परवीन खान, पूजा नाईक यांनी अर्ज सादर केले. प्रभाग २४साठी अनिता मोर्तगिरकर, सरिता नाईक गावकर, पार्वती पराडकर, रतिका शिरोडकर, रेश्मा शिरोडकर यांनी अर्ज सादर केले आहेत. तर प्रभाग २५साठी अश्मा बी, बबिता नाईक, रिया नाईक, कुलसुम शेख, अपूर्वा तांडेल यांनी निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांसमारे अर्ज सादर केला आहे.
नावेलीसाठी चार उमेदवारांत लढत
नावेली जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी अर्जांची छाननी झाल्यानंतर सातपैकी सात उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यातील तीन अर्ज शनिवारी मागे घेण्यात आल्याने काँग्रेसतर्फे प्रतिमा कुतिन्हो, भाजपतर्फे सत्यविजय नाईक, आपतर्फे मटिल्डा डिसिल्वा व अपक्ष एडविन कार्दाेज यांच्यात लढत होणार आहे. तर कुंकळ्ळी नगरपालिकेसाठी शुक्रवारी ६७ अर्ज वैध ठरले होते. यातील एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने कुंकळ्ळीच्या १४ प्रभागासाठी ६६ उमेदवार निवडणूक रिंगणार आहेत.