पेडणे पालिका निवडणुकीसाठी ३७ उमेदवार रिंगणात

आठ अर्ज मागे : प्रभाग तीनमधून सर्वाधिक अर्ज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th March 2021, 11:23 pm

पेडणे : पेडणे पालिकेच्या एकूण दहा प्रभागांत होणाऱ्या निवडणुकीत एकूण ३७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज प्रभाग ३ मधून ७, तर प्रभाग ४ मधून २ उमेदवार आहेत. पेडणे पालिकेची निवडणूक जरी पक्षीय पातळीवर होत नसली तरी भाजपने सर्वात प्रथम उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या नेतृत्वाखाली १० उमेदवारांचे पॅनल जाहीर केले. त्यात माजी नगराध्यक्ष वासुदेव देशप्रभु, माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर, माजी नगरसेवक बाप्पा उर्फ विष्णू साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांचा समावेश आहे.
शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रभाग १ मधून सुवर्णा मयेकर, २ मधून अरविंद पालयेकर, ३ मधून नंदिनी आपुले, समीक्षा आपुले, प्रभाग ४ मधून सुचिता सावळ देसाई ७ मधून वामन कवठणकर व सुरेश माशेलकर व प्रभाग १० मधून प्रभाकर साळगावकर एकूण ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. प्रभाग १ मनोज हरमलकर, प्रकाश कांबळी, दीपक मांद्रेकर, नीलेश मयेकर, प्रभाग २ श्वेता कांबळी, नवनाथ मयेकर, अश्विनी पालयेकर, विश्वनाथ तिरोडकर, प्रभाग ३ रितू आपुले, प्रार्थना गडेकर, रश्मीता गडेकर,‍ आरती कशाळकर, दिया कशाळकर, राखी कशाळकर व सेजल कशाळकर, प्रभाग ४ उषा नागवेकर व रामा नागवेकर, प्रभाग ५ नेहा आसोलकर, विशाखा गडेकर व शीतल कलंगुटकर, प्रभाग ६ गीतांजली सावळ देसाई, सावी सावळ देसाई, सुचिता व तृप्ती सावळ देसाई, प्रभाग ७ डॉ. वासुदेव देशप्रभु, श्रद्धा माशेलकर, सिद्धेश माशेलकर, शिवराम तुकोजी, प्रभाग ८ रमेश बोन्द्रे, डॉ. साईनाथ चणेकर व माधव सिनाई देसाई, प्रभाग ९ छाया पेडणेकर, प्रताप पेडणेकर, राजन पेडणेकर, सिद्धेश पेडणेकर व तुकाराम तांबोस्कर, प्रभाग १० जयेश पालयेकर, नीलेश पेडणेकर व विष्णू उर्फ बाप्पा साळगावकर या ३७ उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले.