फ्रीडा पिंटो- गुणी कलाकार

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
10th January 2021, 01:10 pm
फ्रीडा पिंटो- गुणी कलाकार

चित्रपटविश्वात अभिनेते म्हणून राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेले कोकणीभाषक तसे कमीच. गुरुदत्त (पडुकोण), लीना चंदावरकर, गिरीश कर्नाड, अनंत नाग, दीपिका पडुकोण, उषा नाईक, आशालता वाबगावकर अशी थोडी नावे घेता येतील. त्यातील आणखी एक नाव म्हणजे, फ्रीडा पिंटो. 

फ्रीडाचा जन्म मुंबईचा. १८ आॅक्टोबर १९८४ चा. ती मूळ मंगळुरूची. पण, तिच्या कुटुंबियांचे आयुष्य मुंबईत गेले. लहान असतानाच तिने कलाकार व्हायचे स्वप्न पाहिले होते. सेंट झेवियर महाविद्यालयात पदवीपर्यंतचे तसेच बॅरी जाॅन एक्टिंग स्टुडिओत अभिनयाचे शिक्षण तिने घेतले आहे. महाविद्यालयात असताना तिने हौशी नाटकात काम केले. २००५ साली तिने माॅडेलिंगसाठी इलायट माॅडल मॅनेजमेंट इंडिया या संस्थेत प्रवेश केला. तेथे अडिच वर्षे काम केले. २००७ मध्ये तिला चक दे इंडिया हा हिंदी चित्रपट मिळाला. नंतर २००८ साली क्वांटम ऑफ सोल्स हा चित्रपट. तिचे खरे नाव झाले ते २००८ मधील स्लमडॉग मिलयोनॅर चित्रपटामुळे. यात तिने लतिकाची भूमिका केली. या चित्रपटाला पुढे  ऑस्कर पुरसकारही मिळाला.

रायज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स या २०११ मधील चित्रपटात फ्रीडा चमकली आहे. त्याच साली तिला तृष्णा हा चित्रपट मिळाला. पुढे इमॉर्टल्स, गर्ल रायजींग, डेजर्ट डांसर, लव सोनिया आणि मोंगली- लॅजेंड ऑफ द जंगल, यु विल मीट अ टॉल डार्क स्ट्रेंजर, डे ऑफ द फाल्कन अशा चित्रपटात तिने काम केले आहे. यातील बहुतेक चित्रपट इंग्रजी आहेत. गोरिला म्युजिक व्हिडिओतही ती दिसली आहे. २०१५ त तिने नायट ऑफ कप्स आणि ब्लंट फोर्स ट्रावमा हे चित्रपट केले. 

महिलांच्या, तसेच विशेषाधिकार नसलेल्या मुलांसाठींच्या मोहिमांमध्ये फ्रीडाने भाग घेतला आहे. त्यासाठी निधी जमवला आहे. टीव्ही, माहितीपट, चित्रपटांना आर्थिक हातभार लावणाऱ्या “वी डु ईट टुगेदर” या महिला अधिकार संस्थेसाठी ती काम करते. 

पीपल मासिकाच्या “जास्त सुंदर व्यक्ती” आणि “ जागतिक महिला पोषाख” मासिकांच्या वार्षिक यादीत फ्रीडाचे २००९ साली नाव आले होते. वोग मासिकाच्या “पहिल्या दहा फॅशनेबल महिलां”मध्ये तिचे नाव आले होते. तिला स्लमडॉग मिलयोनॅरसाठी पामस्प्रींग आंतरराष्ट्रीय महोत्सवात ब्रेकथ्रु परफोर्मन्स पुरस्कार, स्क्रीन एक्टर्ज गील्ड पुरस्कार लाभला आहे. २०१८ मध्ये मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सवात फ्रीडाला पुरस्कार मिळाला होता. तिला शुभेच्छा. 

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)