कसोटी फलंदाजांत विराट दुसर्‍या स्थानी

ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानी


16th December 2020, 10:26 pm
कसोटी फलंदाजांत विराट दुसर्‍या स्थानी

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने ‘आयसीसी’ कसोटी फलंदाजांच्या यादीत एक स्थानाची बढत मिळवली असून तो दुसर्‍या स्थानी आहे. यादीत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे सातव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (९११ गुण) अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन तिसर्‍या, ऑस्ट्रेलियाचा मार्नस लबूशेन, पाकिस्तानचा बाबर आझम आणि डेव्हिड वॉर्नर हे अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. गोलंदाजांच्या यादीत भारताचा जसप्रीत बुमराह (७७९ गुण) आणि रविचंद्रन अश्विन (७५६ गुण) अनुक्रमे आठव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ९०४ गुणांसह अग्रस्थानी आहे. अष्टपैलूंच्या यादीत रवींद्र जडेजा तिसर्‍या आणि अश्विन सहाव्या स्थानावर आहेत.