हरमलच्या प्रवीण सिक्स संघाला विजेतेपद

रवळनाथ स्पोर्ट्स क्लबतर्फे व्हॉलिबॉल स्पर्धा


24th November 2020, 11:37 pm

हरमल : येथील रवळनाथ स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब आयोजित आंतर ग्राम विद्युतझोतातील व्हॉलिबॉल स्पर्धेत सुदन सिक्स संघाचा २ वि १ सेट्सनी पराभव करून प्रवीण सिक्स हरमल संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता.
स्पर्धा विजेत्यांना रोख रु. २ हजार व चषक तसेच उपविजेत्या संघास रोख रुपये १,५०० व चषक देण्यात आले. दोन्ही बक्षिसे व चषक अध्यक्ष दत्ताराम ठाकूर व खजिनदार प्रमोद नाईक यांनी पुरस्कृत केले होते. करोना काळात क्लबने स्पर्धा व वर्धापनदिन साजरा केला नाही. मात्र, सध्या परिस्थिती आटोक्यात असल्याने व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करून संघाने खेळाडूंना चार्ज केले असून आगामी काळात संघ नव्या भरारीने मार्गक्रमण करेल, असे अध्यक्ष दत्ताराम ठाकूर यांनी सांगितले. दोन्ही संघांनी अंतिम फेरीत उत्कृष्ट खेळ करून मने जिंकली त्याबद्दल अभिनंदन असल्याचे ठाकूर यांनी व्यक्त केले.
बक्षीस वितरण समारंभास अध्यक्ष दत्ताराम ठाकूर, सचिव सद्गुरू ठाकूर, प्रमोद नाईक, शंकर ठाकूर, सकोजी नाईक, बाळा नाईक, रामचंद्र ठाकूर, सुशांत नाईक आदींनी सहकार्य केले. स्पर्धेसाठी विनय नाईक यांनी पंच म्हणून काम पाहिले.
फोटो : विजेत्या प्रवीण सिक्स संघास बक्षीस देताना दत्ताराम ठाकूर. सोबत सद्गुरू ठाकूर, आत्माराम नाईक, संतोष नाईक, बाळा नाईक व इतर