जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज : वॉन


07th November 2020, 09:33 pm

दुबई : जसप्रीत बुमराह आयपीएल २०२० मध्ये जबरदस्त गोलंदाजी करत आहे. त्याने दिल्ली विरुद्ध आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली आणि या क्षणी तो या लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडूही आहे. दिल्लीविरुद्ध त्याने ४ विकेट घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅच ठरला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने बुमराहला जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हटले आहे. बुमराहने दिल्लीविरुद्ध केलेल्या कामगिरीनंतर त्याने हे वक्तव्य केले आहे.
बुमराहच्या गोलंदाजीमुळे मुंबईने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. वॉन म्हणाला, शेवटच्या तीन सामन्यांत बुमराहने १० विकेट घेत ४५ धावा दिल्या. टी-२० क्रिकेटमध्ये हे दिसत नाही. त्यामुळे सध्या तरी तो या क्षणी जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की तो थांबतो आणि शेवटच्या क्षणी बॉल फेकतो. दिल्ली ‌विरुद्धच्या सामन्यात त्याने स्टोनिसला बाद केलेला चेंडू खूप वेगवान होता आणि काही समजण्याआधी तो बॉल वेगाने आला. जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२० च्या हंगामात आतापर्यंत एकूण १४ सामने खेळले आहेत आणि २७ विकेट घेतल्या आहेत.