Goan Varta News Ad

स्पॅनिसश लीग : रियाल सोसिदादची सेल्टावर मात

|
02nd November 2020, 11:40 Hrs
स्पॅनिसश लीग : रियाल सोसिदादची सेल्टावर मात

माद्रिद : डेव्हिड सिल्वाने आपल्या जुन्या संघाविरुद्ध गोल करत आपल्या नव्या संघात स्वत:चे खाते उघडले. यामुळे रियाल सोसिदादने रविवारी सेल्टा विगोवाचा ४-१ने पराभव करत स्पॅनिश फुटबॉल लीग ला-लिगामध्ये रियाल माद्रिदला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे.
सिल्व्हाने सामन्यातला पहिला गोल केला. त्यानंतर विल्यम जोसने २ गोल केले तर मायकल ओयर्झाबालनेही गोल केला. यामुळे सोसिदादचे १७ गुण झाले असून रियाल माद्रिदच्या तुलनेत ते एका गुणाने आघाडीवर आहेत. रियाल माद्रिदने मात्र त्यापेक्षा एक सामना कमी खेळला. सेल्ताकडून एकमेव गोल इगो एस्पसने केला.
दशकभर मँचेस्टर सिटीकडून खेळल्यानंतर सिल्वा या हंगामात सोसिदादसोबत खेळत आहे, परंतु या सामन्यापूर्वी त्याने आपल्या नवीन संघासाठी कोणतेही गोल केले नव्हते. शनिवारी रियाल माद्रिदने ह्युस्काला ४-१ असे पराभूत केले. अ‍ॅटलेटिको माद्रिद तिसऱ्या क्रमांकावर आहे परंतु त्यांनी रियाल माद्रिदपेक्षा एक सामना कमी खेळला आहे. बार्सिलोना टेबलमध्ये १२ व्या स्थानावर आहे.