कोविडविरोधी लढ्यात प्रगतीचा टप्पा

-तब्बल ८५ दिवसांनंतर प्रथमच सक्रिय रुग्णसंख्या सहा लाखांपेक्षा कमी

Story: दिल्ली : |
31st October 2020, 12:12 am
कोविडविरोधी लढ्यात प्रगतीचा टप्पा

दिल्ली : कोविडविरोधी लढ्यामध्ये भारताने प्रथमच एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जवळपास तीन महिन्यांमध्ये (८५ दिवस) प्रथमच सक्रिय रुग्णसंख्या सहा लाखांपेक्षा कमी झाली आहे. भारतात शुक्रवारी ५.९४ लाख सक्रिय रुग्णांची नोंद आहे. ६ ऑगस्ट रोजी ५.९५ लाख सक्रिय रुग्ण संख्या होती. 

 देशातील एकूण बाधितांची संख्या ५,९४,३८६ इतकी असताना सक्रिय रुग्णांची संख्या सध्या केवळ ७.३५ टक्के इतकीच आहे. त्यामुळे या आकड्यामध्ये सतत घसरण होण्याची प्रक्रिया आणखी मजबूत झाली आहे. विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधील सक्रिय रुग्ण संख्येचा वेग प्रत्येक ठिकाणी त्यांच्या प्रयत्नांनुसार वैविध्यपूर्ण आहे आणि जागतिक महामारीच्या विरुद्ध असलेल्या लढ्यामध्ये हळूहळू प्रगती दर्शवित आहेत.

निरीक्षणे अशी...

* भारतात रुग्ण बरे होण्याचा दर देखील कायम राखण्यात आला आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या  ७३,७३,३७५ इतकी आहे. 

* रुग्ण बरे होण्याच्या संख्येमध्ये जागतिक पातळीवर भारत हा नेहमीच अव्वल क्रमांकांमध्ये राहिला आहे. सक्रिय रुग्णसंख्या आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या यामधील फरक हा सातत्याने वाढत राहिला आहे आणि तो आता ६,७७८,९८९ इतका आहे.  

* ५७,३८६ रुग्ण बरे झाले आहेत आणि गेल्या २४ तासांत त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर नव्याने नोंद झालेल्या रुग्णांची संख्या ४८,६४८ इतकी आहे. 

* रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९१.१५ टक्के इतका आहे. बरे झालेले ८० टक्के रुग्ण हे १० राज्य, केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. 

* केरळमध्ये एका दिवशी सर्वाधिक बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८,००० इतकी नोंदविण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे प्रत्येकी ७,००० पेक्षा अधिक बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे.

........................................................

गेल्या २४ तासांत ४८,६४८ इतकी नव्याने नोंद झालेली रुग्णसंख्या आहे. यापैकी ७८ टक्के रुग्ण हे १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. केरळमध्ये अजूनही नवे बाधित वाढत आहेत. तेथे ७,००० पेक्षा अधिक नोंद झाली आहे. त्याबरोबर महाराष्ट्र आणि दिल्ली येथे प्रत्येकी ५,०००हून अधिक बाधित आढळून आले आहेत. 

.........................................................................

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू 

गेल्या २४ तासांत ५६३ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८१ टक्के संख्या ही १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची (१५६) नोंद आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ६१ मृत्यूंची नोंद आहे.