कांदा बियाणे निर्यातीसही बंदी

देशातील कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणलेली असताना आता कांदे बियाणांच्या निर्यातीवरही सरकारने बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

Story: दिल्ली : |
30th October 2020, 01:54 am
कांदा बियाणे निर्यातीसही बंदी

दिल्ली : देशातील कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणलेली असताना आता कांदे बियाणांच्या निर्यातीवरही सरकारने बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. 

अतिवृष्टी झाल्याने कांद्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झालेे आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने निर्यातीवर बंदी घातली होती. सप्टेंबरमध्ये घालण्यात आलेल्या बंदीनंतर केंद्राने कांदा बियाण्यांच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. देशात कांदा उत्पादक शेतकर्‍यांना स्थानिक पातळीवर माफक दरात व मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

ऊस उत्पादकांना दिलासा 

दिल्ली : दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इथेनॉल खरेदीसाठी नव्या यंत्रणेस मंजुरी देण्यात आली आहे. यासोबत किंमतीही वाढवण्यात आल्या. सरकारच्या या निर्णयाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना फायदा मिळणार आहे.