बँकांकडून व्याजमाफी

केंद्र सरकारने घोषणा केल्यानुसार कर्जांच्या हप्तेस्थगितीसंदर्भात व्याजावर लागणार्‍या व्याजास माफी देण्याची योजना पाच नोव्हेंबरपर्यंत लागू करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत.

Story: मुंबई : |
29th October 2020, 12:45 am
बँकांकडून व्याजमाफी

मुंबई : केंद्र सरकारने घोषणा केल्यानुसार कर्जांच्या हप्तेस्थगितीसंदर्भात व्याजावर लागणार्‍या व्याजास माफी देण्याची योजना पाच नोव्हेंबरपर्यंत लागू करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. 

 दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जांसाठी सहा महिन्यांची हप्ते स्थगिती घेतली असेल, तर त्यासाठी ही व्याजमाफी मिळणार आहे. या योजनेची घोषणा मागील आठवड्यात करण्यात आली होती.

या योजनेमध्ये विशिष्ट कर्जखात्यांनी सहा महिन्यांची हप्तेस्थगिती (मोराटोरियम) घेतली असेल आणि हे हप्ते संपूर्ण कर्जफेडीचा कालावधी संपल्यानंतर भरण्याचे मान्य केले असेल, तर अशा कर्जखात्यांच्या थकित हप्त्यांवर बँका आकारणार असलेल्या व्याजासाठी अनुदान दिले जाणार आहे. कर्जाच्या हप्त्यामध्ये मुद्दल आणि व्याज या दोघांचा समावेश असतो. अशा थकित हप्त्यावर पुन्हा व्याज आकारणी झाल्यास ती चक्रवाढ पद्धतीने होणार आहे. म्हणून चक्रवाढ आणि सरळ असा दोन्ही व्याजांमधील फरक हा सानुग्रह अनुदान म्हणून केंद्र सरकार देणार आहे. याचाच अर्थ सामान्य कर्जदारांसाठी व्याजावरील व्याज माफ केले जाणार आहे.