Goan Varta News Ad

इंग्लिश प्रीमियर लीग : वेस्ट हॅमने मँचेस्टरला बरोबरी रोखले

|
25th October 2020, 07:29 Hrs
इंग्लिश प्रीमियर लीग : वेस्ट हॅमने मँचेस्टरला बरोबरी रोखले

लंडन : इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पर्धेत वेस्ट हॅमने दिग्गज संघ मँचेस्टर सिटीला १-१ गोलने बरोबरीत रोखले. लीगच्या शेवटच्या सहा वर्षांत सिटीची ही सर्वात वाईट सुरुवात आहे. पाच सामन्यांपैकी संघाने आठ गुण मिळवले आहेत आणि ते टेबलमध्ये १२ व्या स्थानावर आहेत.
वेस्ट हॅमचेही समान सामन्यांमध्ये १२ गुण आहेत पण गोलांच्या फरकांमुळे ते ११ व्या स्थानावर आहेत. १८ व्या मिनिटाला मिखाईल अँटोनियोने आघाडी घेत वेस्ट हॅमने मॅनचेस्टर सिटीवर दबाव आणला. संघाने मात्र ५१ व्या मिनिटाला फिल फोडनच्या गोलने बरोबरी साधली.
लिव्हरपूलकडून शेफील्ड पराभूत
इन्फिल्ड स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात गतविजेत्या लिव्हरपूलने शेफील्ड युनायटेडला २-१ असे पराभूत केले. शेफील्डने सामन्याच्या १३ व्या मिनिटाला सेंडर बर्जेच्या गोलच्या मदतीने आपले खाते उघडले. पेनल्टीवर बर्जेने गोल केला. यानंतर लिव्हरपूलची टीम चांगली खेळली.
यजमान लिव्हरपूलने ४१ व्या मिनिटाला रॉबर्टे फेर्मिनोच्या गोलने बरोबरी साधून १-१ अशी बरोबरी केली. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघ १-१ने बरोबरीत होते. दुसऱ्या हाफच्या सुरूवातीच्या काही वेळानंतर लिव्हरपूलने आणखी एक गोल केला आणि सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली.
लिव्हरपूल संघासाठी दुसरा गोल ६४ व्या मिनिटाला डायगो जोटाने केला. यजमान संघाने अखेर हा सामना आपल्या नावावर केला. लिव्हरपूलच्या टीमचा एनफिल्ड स्टेडियमवर झालेल्या २९ लीग सामन्यांमधील हा २८ वा विजय आहे. त्याचबरोबर शेफील्ड युनायटेडला मागील सहा सामन्यांमधून एकही गुण मिळालेला नाही.