देवेंद्र फडणवीस करोनाबाधित


24th October 2020, 11:15 pm
देवेंद्र फडणवीस करोनाबाधित

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली.
फडणवीस यांनी ट्वीट केले की, लॉकडाऊन झाल्यापासून मी दररोज काम करत आहे, पण आता असे दिसते की थोडावेळ थांबून थोडा वेळ घ्यावा!' मी कोविड पॉझिटिव्ह असून सध्या विलगीकरणात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध आणि उपचार घेत आहे. फडणवीस यांनी पुढे लिहिले की, जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोविड १९ चाचणी करून घ्यावी.
त्याआधी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी, दोन मोठे नेते शाहनवाज हुसेन आणि राजीव प्रताप रुडी यांनाही करोना संसर्ग झाल्याचे आढळले. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबरला होणार आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांना करोना होणे हे भाजपच्या प्रचारासाठी मोठा धक्का मानला जात आहे.