आगशीत धीरयो, ८ जणांना अटक

एका बैलाचा मृत्यू


24th October 2020, 10:21 pm

जुने गोवे : दांडी-आगशी येथे धीरयो आयोजित केल्याबद्दल आगशी पोलिसांनी गुरुवारी ८ जणांना अटक केली आहे. सकाळी ६ वाजता आयोजित केलेल्या या धीरयो दरम्यान एका बैलाचा मृत्यू झाला. अटक केलेल्यांमध्ये बेव्हन मोंतेरो, हुसेन पटेगार, विशाल शेख, अरबाज बेपारी, महेश नाईक, करीम बेपारी, नीतेश पालेयकर आणि सुदेश गोवेकर यांचा समावेश आहे. या सर्वांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक योगेश गडकर पुढील तपास करत आहेत.