बिहारच्या पुत्रांचे तिरंग्यासाठी बलिदान

- नरेंद्र मोदी : प्रचार सभेत विरोधकांचाही समाचार

Story: पाटना : |
24th October 2020, 01:38 am
बिहारच्या पुत्रांचे तिरंग्यासाठी बलिदान

पाटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी एनडीएच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून, सासाराम येथे आयोजित रॅलीला संबोधित करताना तेजस्वी यादवांसह विरोधकांवर त्यांनी टीकास्त्र डागले.बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार रंगात आला आहे. महाआघाडी विरुद्ध एनडीए असा राजकीय सामना रंगलेला दिसत असून, पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली शुक्रवारी सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला. तसेच कलम ३७० वरून विरोधकांवर जोरदार टीका केली. बिहारच्या पुत्रांनी तिरंग्यासाठी आणि भारत मातेची मान उंच ठेवण्यासाठी गलवान व्हॅलीत बलिदान दिले. पुलवामा हल्ल्यातही बिहारचे जवान शहीद झाले. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, असेही मोदी म्हणाले.