डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर टीका

- वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका : इंडियन नेटिझन्सकडून निषेध

Story: वॉशिंग्टन : |
24th October 2020, 01:30 am
डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर टीका

वॉशिंग्टन : अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अखेरचा वादविवाद नुकताच झाला. यावेळी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे. भारत हा विषारी हवा सोडणारा देश असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केलेय. त्यावरून भारतातूनही टीका होऊ लागली आहे. 

अध्यक्षीय वादविवादात ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करतो. त्या उलट चीन, भारत आणि रशिया आपल्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे. हे देश प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पॅरिस करारातून बाहेर पडण्याचे त्यांनी यावेळी समर्थन केले. पॅरिस करार हा एकतर्फी होता. या करारामुळे अमेरिकेचे नुकसान झाले असते त्यांनी म्हटले.

ट्रम्प यांनी भारताबाबत केलेल्या वक्तव्यानंतर दशभरातूून सोशल मीडियावर निषेध व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांनीही टीका केली आहे. 

‘सध्याचे सरकार परवडणारे नाही’ 

अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सहभाग घेतला आहे. ओबामा यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करोना साथरोगाला हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल कठोर टीका केली. आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना मतदान करण्याचे आवाहनही ओबामा यांनी केले. फिलाडेल्फिया येथे भाषण करताना ओबामा यांनी आपल्याला आणखी चार वर्षे सध्याचे सरकार परवडणारे नाही, असे विधान करून ट्रम्प यांच्या सरकारवर निशाणा साधला. ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये बायडन हे उपाध्यक्ष होते. बायडन व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचारामध्ये ओबामा प्रथमच उतरले. बायडन व हॅरिस यांच्याकडे अर्थव्यवस्था आणि करोना साथरोगाचा अटकाव याविषयी योजना असल्याचे ओबामा यांनी या वेळी सांगितले. फिलाडेल्फिया येथे भाषण करताना ओबामा यांनी आपल्याला आणखी चार वर्षे सध्याचे सरकार परवडणारे नाही, असे विधान केले. 

.