विलास मेथर खून; उद्योजकाला अटक

संशयित पवन, प्रशांत यांनी पसार होण्यासाठी वापरलेली कार संशयित शैलेश शेट्टी याची


21st October 2020, 12:09 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता

म्हापसा : पर्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर यांच्या खून प्रकरणात उद्योजक शैलेश उर्फ शैलू रवींद्र शेट्टी (४६, रा. आल्तो पर्वरी) याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

बुधवार, १४ रोजी हे प्रकरण घडले होते. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून संशयितांना अटक केली आहे. बिल्डर अल्ताफ शब्बीर यारगट्टी, खय्याद शेख, पवन श्रीकांत बडिगर, प्रशांत लक्ष्मण दाभोळकर, इक्बाल नानपुरी व संतोष गोपालकृष्ण पिल्लाई यांना अटक केली होती. संशयित पवन व प्रशांत यांनी महाराष्ट्रात पसार होण्यासाठी वापरलेली कार संशयित शैलेश शेट्टी याची होती. या प्रकरणात हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी शेट्टी यास गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर करत आहेत.


हेही वाचा