कोकणी साहित्यिक तानाजी हळर्णकर यांचे निधन

कोकणी भाषा मंडळाच्या वतीने श्रद्धांजली


19th October 2020, 11:46 pm
कोकणी साहित्यिक  तानाजी हळर्णकर यांचे  निधन

फोटो : तानाजी हळर्णकर

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : कोकणी भाषा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. तानाजी हळर्णकर (७७) यांचे सोमवारी निधन झाले. कोकणी भाषा मंडळाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ते एक व्यासंगी विचारवंत, संघटक, आयोजक आणि उत्तम प्रशासक होते. कोकणीतील पहिला चार खंडांचा विश्वकोष गोवा विद्यापीठाच्या वतीने संपादित करण्याचे काम त्यांनी केले. ‘फागूरफाट’ हे त्यांचे चिंतनात्मक लेखांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. सुनापरान्त दैनिकात ‘थोडें म्हजें, थोडें तुमचें’ हे सदर गाजले होते. दै. भांगरभूंयच्या व्यवस्थापनात त्यांनी काही काळ काम केले. त्यांनी एकांकिका आणि स्फूट लेखनही केले आहे. कोकणी कोष रचनेत त्यांनी निमंत्रक म्हणून भूमिका बजावताना मोलाचे योगदान दिले आहे.