केरळातील गुन्हेगारांना हरमलात अटक

केरळ पोलिसांकडे त्यांना सुपूर्द करणार


19th October 2020, 11:37 pm
केरळातील गुन्हेगारांना हरमलात अटक

फोटो : अटक केलेल्या अट्टल गुन्हेगारांसमवेत पेडणे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी, उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी व इतर. (निवृत्ती शिरोडकर)

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पेडणे : केरळ पोलिसांना हवे असलेले विविध गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगार स्मित केयस व व्ही. जी. टीबी यांना पेडणे पोलिसांनी सोमवारी हरमल येथे अटक केली.

केरळ येथील या अट्टल गुन्हेगारांवर विविध गुन्हे दाखल आहेत. पेडणे पोलिसांनी त्यांना हरमल येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, विनोद पेडणेकर, अनिशकुमार पोके यांनी कारवाई केली. केरळ पोलिसांकडे त्यांना सुपूर्द करण्यात येणार आहे.