सरकारचा भू रूपांतरणाचा निर्णय शंकास्पद

आपचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी केली टीका


19th October 2020, 10:43 am
सरकारचा भू रूपांतरणाचा  निर्णय शंकास्पद

फोटो : राहुल म्हांबरे

पणजी : करोना महामारीमुळे राज्यात पाचशेहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अलिकडच्या काळात घोटाळ्यांच्या मालिकाच समोर आल्या आहेत. असे असताना भाजप सरकार परिस्थिती सुधारण्याऐवजी भूमी रूपांतरणाचे सर्वेक्षण करण्यात व्यस्त आहे. भू-रूपांतरणचा निर्णय शंकास्पद आहे, अशी टीका आपचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी केली आहे.

राहुल म्हांबरे पुढे म्हणतात, राज्यातील दैनिकांमध्ये जाहीर केलेली अधिसूचना निंदनीय आहे. त्यात जमीन मालकाचे नाव आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांचा उल्लेख नाही. या सगळ्यात सरकार काहीतरी लपवत आहे. महामारीच्या काळात सरकारने घेतलेला भू-रूपांतरणचा निर्णय शंकास्पद आहे. गेल्या वर्षभरात टीसीपी मंत्र्यांनी भूसंपादनासाठी १००० हून अधिक अर्ज मंजूर केले आहेत. हे करण्यामागे सरकारचा काय हेतू आहे त्याची चौकशी करण्याची नितांत गरज आहे. केंद्र सरकारने कोळसा आणि डबल ट्रॅकिंग प्रकल्प उभारण्यासाठी मोले अभयारण्याच्या हद्दीतील झाडे तोडण्याची मंजुरी दिली दिली. तरीही सावंत सरकारने यावर काहीच भाष्य केले नाही.