पंतप्रधानांच्या संपत्तीत वाढ, शहांची घटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तर गृहमंत्री अमित शाह यांच्या संपत्तीत घट झाली आहे.

Story: दिल्ली : |
16th October 2020, 12:35 am
पंतप्रधानांच्या संपत्तीत वाढ, शहांची घटली

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तर गृहमंत्री अमित शाह यांच्या संपत्तीत घट झाली आहे. १२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान कार्यालयाकडे दाखल झालेल्या संपत्तीच्या विवरणातून ही बाब समोर आली आहे.पीएमओच्या माहितीनुसार, ३० जून रोजी पंतप्रधान मोदींची निव्वळ संपत्ती २.८५ कोटी रुपये होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे.