आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनला झटका

संयुक्त राष्ट्र संघात भारताने केली मात


15th September 2020, 05:43 pm

जिनिव्हा : सीमेपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला चांगलाच झटका बसला आहे. आता भारताने चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषदेची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.
‍भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये चीनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर भारत आणि अफगाणिस्तानने ५४ सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला. त्यामुळे चीनला जोरदार झटका बसला आहे. प्रतिष्ठित ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’चे सदस्यत्व भारताने मिळवले आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

बीजिंग कॉन्फरन्स ऑन वुमनचे (१९९५) यावर्षी २५ वे वर्ष आहे. चीनकडून सध्या सीमेवर कुरापती काढण्यात येत आहे. अशीवेळी चीनला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या विजयानंतर भारत पुढील चार वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल. २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा सदस्य असणार आहे.