Goan Varta News Ad

रोहित शर्माचा सराव सुरू

|
16th August 2020, 08:22 Hrs
रोहित शर्माचा सराव सुरू

मुंबई :इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रोहित शर्माची बॅट तळपताना पाहण्यासाठी सर्वजण आतूर आहेत. रोहितही दमदार फटकेबाजीसाठी सज्ज झाला असून मुंबई इंडियन्सने त्याचा सरावाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे रोहित शर्माही मुंबईतील घरातच अडकला होता. फेब्रुवारीतील न्यूझीलंड दौऱ्यानंतर रोहित क्रिकेटपासून दूर आहे. आता पुढील महिन्यात रोहित मैदानावर फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
आयपीएलच्या १३व्या पर्वाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यास केंद्र शासनाने सोमवारी औपचारिक मंजुरी प्रदान केली. लीगचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत शारजा, अबुधाबी आणि दुबईत होणार आहे.