
डिचोली : मूळ कर्नाटक (karnataka) येथील पण गेल्या काही दिवसांपूर्वी गोव्यातील (Goa) डिचोली तालुक्यातील म्हावळींगे येथे आपल्या पतीला सोडून २.७ वर्षीय चिमुरडी व प्रियकरासह आलेल्या एका महिलेने आपल्याच मुलीचा चिमुरडीचाच जीव प्रियकाराच्या सहकार्याने घेतल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी (Goa Police) तपास करून दोघांनाही अटक केली होती. आता याप्रकरणातील मास्टर माईन्ड असलेल्या चित्रदुर्ग, कर्नाटक येथील कलेश गंगा धारप्पा (२१ वर्षे) याला डिचोली पोलिसांनी (Bicholim Police) कर्नाटकात अटक केली. अटक करण्यातआलेल्या युवकाला सात दिवसांचीपोलीस कोठडी सुनावण्यात आलीआहे.
डिचोली पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने अटक करून डिचोलीत आणले आहे. त्यामुळे याप्रकरणातील तपासाला अधिक गती मिळणार आहे.
बेशुद्धावस्थेत सदर मुलीला डिचोली येथील सरकारी सामाजीक आरोग्य केंद्रात आणल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला होता.
डिचोली पोलिसांनी सदर आईसहीत प्रियकरालाही अटक केली होती. उपलब्ध माहितीनुसार, कर्नाटक राज्यातून एक महिला आपल्या २.७ वर्षीय लहान मुलीला घेऊन प्रियकरासह फरार झाली व गोव्यात आली. रहायला खोली शोधत असताना म्हावळींगे येथे पोहोचले असता येथील एकाने त्यांना खोली दिली. त्यात ते दोघेही मुलीसह वास्तव्य करीत होते. सदर प्रियकर हा जवळील चिरेखाणीवर कामाला होता.
१५ ऑक्टो. रोजी संध्याकाळी सदर महिला व तिचा प्रियकर डिचोली येथून मुलीला घेऊन म्हावळींगे येथे पोहोचले. म्हावळींगे सीमेवरील गेटजवळ पोहोचण्यापूर्वी त्यांनी जवळील एका दुकानावर मुलीसाठी पाणी घेतले. पाणी पाजण्यासाठी मुलीला खाली झोपविले असता मुलीची काहीच हालचाल दिसत नव्हती. त्यामुळे म्हावळींगे येथील स्थानिकांना संशय आला. मुलगी निपचित बेशुद्धावस्थेत असल्याने त्यांनी थेट १०८ रूग्णवाहिकेला संपर्क केला. सदर रूग्णवाहिकेतून मुलीला डिचोली येथील सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे तपासले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. होते.
यावेळी सदर मुलीची आई व प्रियकरही सोबत होता. मुलीला मृत घोषित करताच सदर माहिती डिचोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह बांबोळी येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला व आई व प्रियकराला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते.
बांबोळी येथे मुलीचे शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृत्यू गुदमरून झाल्याचे निदाद समोर आल्यामुळे या प्रकरणात घातपात असल्याचे सिध्द झाले होते. तसेच या मुलीच्या अंगावर अनेक काठीने माराचे व्रण निदर्शनास आले. सदर प्रियकर हा चिमुरडीला बेदम मारहाण करीत असल्याचे या प्रकरणात दिसून आले होते डिचोली पोलिसांनी लागलीच या प्रकरणी तपासकामाला गती देत हे प्रकरण खून म्हणून नोंद केले होते.