पेडणे ते काणकोणपर्यंत श्रीपादभाऊंचे भरीव योगदान!

मुख्यमंत्र्यांचे कौतुकोद्गार : श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस साजरा


05th October, 12:02 am
पेडणे ते काणकोणपर्यंत श्रीपादभाऊंचे भरीव योगदान!

वाढदिवसानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना पुष्पहार घालून शुभेच्छा देताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री दिगंबर कामत व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पेडणेचे आयुष हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो लोक लोक उपचार घेत आहेत. ते हॉस्पिटल श्रीपादभाऊंमुळेच शक्य झाले. श्रीपादभाऊंनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात पेडणे ते काणकोणपर्यंत विविध प्रकल्प उभारले आहेत. जनतेने दिलेल्या आशिर्वादामुळष न थकता लोकसेवा करण्याचा ध्यास श्रीपादभाऊंनी घेतला आहे, अशी स्तुतीसुमने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रीपाद नाईक यांच्यावर उधळली.
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त साओ पेद्रो जुने गोवा येथील त्यांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. अयोध्येतील श्री राममंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते भाऊंच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘समर्पण’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, क्रीडामंत्री रमेश तवडकर, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, कृषीमंत्री रवी नाईक आदी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त आयुर्वेदिक मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मागील २५ वर्षे श्रीपादभाऊ सात्यताने उत्तर गोवा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. या काळात त्यांनी राज्याच्या विकासकामात दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. विरोधक श्रीपादभाऊंनी गोव्यासाठी काय केले, असा प्रश्न विचारतात. त्यांच्यासाठी एकच सांगावेसे वाटते, ज्यांना दृष्टी असेल त्यांना त्यांचे कार्य दिसते. दृष्टीच नसणाऱ्यांना श्रीपादभाऊंचे कार्यही दिसणार नाही. रायबंदर येथे आयुर्वेद, योग, नेच्युरोपॅथी ही यंत्रणा असलेले हॉस्पिटल उभे राहू शकले. तेव्हा आयुष खाते श्रीपादभाऊंकडे होते, म्हणूनच ते शक्य झाले.
उत्तर गोव्यातील मतदारांमुळे भाऊंना देशसेवेची संधी
श्रीपादभाऊचे गोव्यासाठीचे योगदान खूप मोठे आहे. अटलबिहारी वाजपेयी ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये ते मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी गोव्याबरोबरच पूर्ण देशाची सेवा केली आहे. श्रीपादभाऊंना देशाची सेवा करण्याची संधी उत्तर गोव्यातील मतदारांमुळेच प्राप्त झाली. लोकांनी दिलेले प्रेम आणि आशीर्वाद यामुळे भाऊंनी न थकता काम करण्याचा ध्यास घेतला, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.अशें मुख्यमंत्र्यान म्हणले.