समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार वाढ

कर्मचाऱ्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची हमी, मुख्यमंत्र्यांची भेट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th May, 04:52 pm
समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार वाढ

डिचोली : राज्यात समग्र शिक्षा अंतर्गत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ठराविक पगारावरच गुजराण करावी लागत असून त्या संदर्भात पाठपुरावा करताना शनिवारी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली विनंती मांडली. 

 मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून लवकरच सर्व बाराही ब्लॉगच्या समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची हमी दिली आहे. 

अनेक वर्ष कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मर्यादित पगार देण्यात येत असून त्यात पूर्ण वाढ करण्यात यावी. सरकारच्या इतर योजनांचा लाभ त्यांना मिळावा. तसेच जवळपास अठरा वर्षे काम करणारा, उच्चशिक्षित असलेला हा वर्ग भरीव वेतनापासून वंचित असल्याने त्यांना तातडीने दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी बाराही ब्लॉकच्या समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लवकरच पगार वाढीसंदर्भात फाईल संमत करण्यात येईल अशी हमी दिली. 

हेही वाचा